विंदा करंदीकरांनी बालकविता प्रथम प्रकाशित झाली ती सुमारे पन्नास वर्षांपूर्वी. ती तोपर्यंतच्या बालकवितेपेक्षा पूर्ण वेगळी, वेगळ्या काव्यजाणिवेतून लिहिलेली, नवीन होती. या कवितेने गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मुलांच्या मनावर मोहिनी घातली आहे. बालपणी या कवितांचा आनंद घेणारी मुलं आज मोठी होऊन आपल्या मुला-नातवंडांना तितक्याच आवडीने या कविता वाचून दाखवतात आणि आजची एकविसाव्या शतकातली मुलंही या कवितेच्या बालविश्वात रंगून जातात. हे घडलं कारण या कविता लिहिताना विंदा स्वतः मुलांहून मूल झाले. त्यांचं म